पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – गाडीत मटेरियल चुकीचे टाकल्याबद्दल सुरू असलेल्या वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीवर एका कामगाराने कटरने वार केले. ही घटना बुधवारी (दि. १७ जून) रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास निघोजे येथील इंपिरीयल ऑटो कंपनीचे गेट समोर घडली.
याबाबत कृष्णा दादाराव खिरडकर (वय २५, रा. निघोजे) यांनी गुरुवारी (दि. १८ जून) रोजी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विपुल निरंजन शिंदे (वय २४, रा. निघोजे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विपुल हा फिर्यादीच्या हाताखाली काम करणाऱ्या विशाल सोनवणे याला गाडीत मटेरियल टाकण्यावरून शिवीगाळ करत होता. फिर्यादीने आरोपीला शिवीगाळ न करण्यास सांगितले. या कारणावरून संतप्त झालेल्या आरोपी विपुल याने फिर्यादीला धमकावून त्याच्या उजव्या हाताच्या पोटरीवर आणि डाव्या हाताच्या मधल्या बोटावर कटरने वार करून गंभीर जखमी केले. दक्षिण महाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.
Pimpri-Chinchwad-कामाच्या वादातून कामगाराचा कटरने हल्ला
