Pimpri-Chinchwad-भरधाव ट्रकच्या धडकेत १० वर्षीय बालिकेचा मृत्यू

पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – एक भरधाव ट्रकने स्कुटीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला. तर स्कुटी चालक महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना बुधवारी (दि. १७ जून) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास भांबोली गावच्या हद्दीत संत तुकाराम सर्कल भांबोली येथे घडली.
सृष्टी रोहित कुमार रावत (वय १०) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. या प्रकरणी सीमा सुदाम पुराम (वय २४, रा. ठाकरवाडी, सावरदरी) यांनी गुरुवारी (दि. १८ जून) रोजी उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक चालक विष्णू नरसिंगराव देशमुख (वय ५२, रा. सारणी सांगवी, बीड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सीमा या शेजारी राहणाऱ्या रोहित कुमार रावत यांच्या सृष्टी रावत या मुलीला आपल्या ज्युपिटर स्कुटीवर बसवून घरी जात होत्या. त्यावेळी तळेगाव एमआयडीसीच्या दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या स्कुटीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात सीमा यांच्या हाताला व कानाला गंभीर दुखापत झाली, तर चिमुरडी सृष्टी हिच्या पाठीला, पोटात आणि डोक्यात गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला. उत्तर महाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *