तळेगाव दाभाडेत जुन्या हायवेवर जाहीर वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेवर कारवाई

पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – जुना पुणे-मुंबई हायवेवर वेश्याव्यवसाय करण्याच्या उद्देशाने येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण करणाऱ्या एका महिलेवर पोलिसांनी कारवाई केली आहे. ही कारवाई गुरुवारी (१८ जून) सायंकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास सीआरपीएफ गेट नंबर ३ समोरील वडाच्या झाडाखाली करण्यात आली.
या प्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस कॉन्स्टेबल उदयकुमार भोसले यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संबंधित महिलेला कायद्यानुसार नोटीस देण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आरोपी ही वेश्याव्यवसाय करण्याच्या उद्देशाने लैंगिक हावभाव व अश्लील शब्दांचे उच्चार करत सार्वजनिक ठिकाणी उभी होती. तिच्या या कृत्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या लोकांना अडथळा निर्माण होऊन सार्वजनिक शिष्टाचाराचा आणि सभ्यतेचा भंग झाला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *