आयफोन खरेदीच्या बहाण्याने फसवणूक

पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – एका अनोळखी युवकाने आयफोन १७ प्रो मोबाईल खरेदीच्या बहाण्याने दुकानदाराची १ लाख ३५ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. ही घटना मावळ तालुक्यातील वराळे फाटा येथील विजय सेलवन मोबाइल शॉपीमध्ये दि. १६ जून रोजी सायंकाळी घडली.
याप्रकरणी एका चोरट्याच्‍या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुरेश एकनाथ गोपाळे (वय ४१, रा. वराळे, ता. मावळ, जि. पुणे) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीच्या दुकानात येऊन आयफोन खरेदी करण्याचा बहाणा केला. त्याने मोबाइलची रक्कम एक लाख ३५ हजार रुपये ऑनलाइन पाठविल्याचा बनावट स्क्रीनशॉट फिर्यादीला दाखवून विश्वास संपादन केला व प्रत्यक्षात कोणतीही रक्कम न देता मोबाइल घेऊन फसवणूक केली. तळेगाव एमआयडीसी पोलीस पुढील तपास करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *