पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – घरभाड्याच्या पैशांवरून झालेल्या वादात घरमालक आणि त्याच्या मुलासह चौघांनी मिळून भाडेकरू व त्यांच्या पत्नीला कोयत्याने मारहाण केली. ही घटना दि. १८ जून रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास थेरगाव येथील श्रीकृष्ण कॉलनीत घडली.
बबन काटे (वय ४५), त्याचा मुलगा (दोघेही रा. पिंपळे सौदागर) व त्यांचे दोन साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. विकास मधुकर पंडीत (वय २६, रा. सुंदरकॉलनी, थेरगाव) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पैशांच्या वादातून आरोपी बबन काटे याने फिर्यादीशी वाद घालून शिवीगाळ केली. त्यानंतर त्याच्या मुलाने व इतरांनी फिर्यादी व त्यांच्या पत्नीला मारहाण केली. आरोपीच्या मुलाने लोखंडी कोयता उलट्या बाजूने फिर्यादीच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. काळेवाडी पोलीस पुढील तपास करीत आहे.
घरभाड्याच्या वादातून दाम्पत्याला कोयत्याने मारहाण
