गांजा ओढणाऱ्या दोन रिक्षाचालक पोलिसांच्या जाळ्यात

पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करताना दोन रिक्षाचालकालावर पोलिसांनी वेगवेगळे गुन्‍हे दाखल केले आहेत. ही कारवाई १९ जून रोजी आळंदी येथील योगीराज चौकातील पीएमपीएमएल बस स्टॉपजवळ करण्‍यात आली.
​ओंकार विठ्ठल पंडित (वय २१) आणि अधिराज विठ्ठल पंडित (वय २५, दोघेही रा. केळगाव, आळंदी देवाची, ता. खेड) यांच्याविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. दोन्‍ही गुन्‍ह्यांमध्‍ये पोलीस शिपाई सोमनाथ बाळू खळसोडे यांनी दिघी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस पथक गस्तीवर असताना दोन्‍ही आरोपी हे वेगवेगळ्या वेळी बस स्टॉपजवळील मोकळ्या जागेत अंमली पदार्थ असलेल्या गांजाचे सेवन करत असताना मिळून आले. याप्रकरणी दिघी पोलीस पुढील तपास करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *