पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – रस्ता ओलांडणाऱ्या एका तरुणाला टेम्पोने जोरात धडक दिली. या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना दि. १८ जून रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील म्हाळुंगे गावच्या कमानीजवळ घडली.
अशोक परसु गौंड (वय २५) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. टेम्पो चालक दीपक रामभाऊ राठोड (रा. कोठा, जि. परभणी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रश्मी अशोक गौड (वय २२, रा. म्हाळुंगे, ता. खेड, मूळ रा. मध्य प्रदेश) यांनी याप्रकरणी उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींचे पती अशोक गौंड हे पायी रस्ता ओलांडत होते. दरम्यान, तळेगावकडून चाकणकडे जाणाऱ्या आयशर टेम्पोने त्यांना धडक दिली, या अपघातात अशोक यांचा मृत्यू झाला. उत्तर म्हाळुंगे पोलीस पुढील तपास करीत आहे.
—
टेम्पोच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
