पुणे(pune) : शहरातील वाढती वाहतूककोंडी कमी करण्यासाठी रेल्वे फाटकांच्या जागी उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग उभारण्याच्या कामांना आता वेग मिळणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत रेल्वे उड्डाणपूल (आरओबी) आणि रेल्वे मार्गाखालील भुयारी मार्ग (आरयूबी) जलदगतीने उभारण्यात येणार आहेत.
या प्रकल्पांमुळे रेल्वे फाटकांवरील प्रतीक्षा वेळ कमी होऊन वाहतुकीचा प्रवाह सुरळीत होण्यास मदत होणार आहे. तसेच नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा ठरणार आहे.
पीएमआरडीए आणि रेल्वे प्रशासनाच्या समन्वयातून या महत्त्वाच्या प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यात येणार असून, त्यामुळे पुणे महानगर क्षेत्रातील वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
