Mumbai-उद्धव ठाकरे गटाकडून कृष्णा पाटील यांची पक्षातून हकालपट्टी; हिंगोलीत राजकीय चर्चा रंगल्या

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने कृष्णा नागेश पाटील यांची पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या आरोपावरून पक्षातून हकालपट्टी केली आहे. या निर्णयामुळे हिंगोलीच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

कृष्णा पाटील हे शिंदे गटात गेलेले माजी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे पुत्र आहेत. वडिलांनी बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही कृष्णा पाटील यांनी अनेकदा सोशल मीडियावरून आपण उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक असल्याचे सांगितले होते.

मात्र, पक्षाने त्यांच्यावर पक्षविरोधी कारवायांचा आरोप करत थेट कारवाई केल्याने राजकीय चर्चांना वेग आला आहे. या निर्णयामुळे ठाकरे गटातील अंतर्गत घडामोडी आणि आगामी राजकीय समीकरणांबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *