Indore-री-नीट पेपर विक्रीच्या नावाखाली विद्यार्थ्यांची फसवणूक; इंदूरमध्ये कायद्याच्या विद्यार्थ्याला अटक

इंदूर : री-नीट परीक्षेचा प्रश्नपत्रिका असल्याचे भासवून विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या एका तरुणाला इंदूर गुन्हे शाखेने अटक केली आहे. विशेष म्हणजे आरोपी कोणताही सराईत सायबर गुन्हेगार नसून कायद्याच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी असल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलिसांना री-नीट प्रश्नपत्रिका विक्रीबाबत माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून बनावट पेपर रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. आरोपी इन्स्टाग्रामवर नीट परीक्षेचा पेपर लीक झाल्याचा दावा करून विद्यार्थ्यांना जाळ्यात ओढत होता. त्यानंतर ५० ते १०० रुपये घेऊन कथित प्रश्नपत्रिका विकत असल्याचे आढळून आले.

या प्रकरणानंतर विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी अशा अफवा व सोशल मीडियावरील भ्रामक दाव्यांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. नीट परीक्षेच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *