दुचाकी सिमेंटच्या कठड्याला धडक; चालकासह दोघांचा मृत्यू

पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – भरधाव दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या कठड्याला धडकली. या अपघातात दुचाकीस्वार स्वतःचा आणि मागे बसलेल्या मित्राचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. २१ जून) मध्‍यरात्री २ वाजेच्या सुमारास, हिंजवडी फेज ३ येथील डी.एल.एफ. सर्कल जवळील मेट्रो स्टेशनजवळ घडली.
दुचाकी चालक ऋषिकेश सहदेव पोटदुखे (वय २६, सध्या रा. कासार एक्सप्रिया सोसायटी, वाकड; मूळ रा. अमरावती) आणि अक्षय राजेंद्र कावरे (वय २३) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणात हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल हंसराज गोरे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ऋषिकेश याची भरधाव वेगातील दुचाकी नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या सिमेंटच्या कठड्याला जोरात धडकली. या अपघातात मागे बसलेला त्याचा मित्र अक्षय कावरे याच्या डोक्यास व शरीरास गंभीर मार लागल्याने त्याचा आणि दुचाकी चालकाचा मृत्यू झाला, हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *