पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – गॅस चोरी करणा-या एकास पोलिसांनी पकडले. ही कारवाई शनिवारी (दि. २० जून) रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास, सावरदरी येथील मोरया गॅस सर्विसेसमध्ये करण्यात आली.
पवन महादेव सातपुते (वय २१, रा. सावरदरी, ता. खेड) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल समीर महात यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानवी जीविताला धोका पोहोचणार नाही याची पुरेशी काळजी आणि बंदोबस्त करणे गरजेचे असताना आरोपीने ज्वालाग्रही पदार्थाबाबत जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. तो आपल्या ताब्यातील घरगुती भरलेल्या सिलेंडरमधील एकूण ३१ हजार ६०० रुपये किमतीचा गॅस मोकळ्या सिलेंडरमध्ये भरत असताना मिळून आला. उत्तर महाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.
गॅस रिफिलिंग प्रकरणी एकाला अटक
