Pimpri-Chinchwad-जुन्या भांडणातून एकावर खुनी हल्‍ला

पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – चिंचवडमधील भिमनगर येथे जुन्या भांडणाच्या रागातून एका तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना २२ जून रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास चेतना बारसमोर घडली.
महेश ऊर्फ भैय्या विलास इंगवले (वय २१), ईशान अयाज शेख (वय २१, रा. दोघेही रा. भिमनगर, चिंचवड) व अल्‍पवयीन मुलगा अशी गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपींची नावे आहेत. गणेश रघुनाथ जगताप (वय ४४, रा. भिमनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादीचा भाचा ओमकार उर्फ हेमंत ओव्हाळ याला लाथाबुक्क्यांनी व कोयत्याने मारून गंभीर जखमी केले. “आम्ही इथले भाई आहे” असे म्हणून त्यांनी परिसरात दहशत निर्माण केली. चिंचवड पोलीस ठाणे पुढील तपास करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *