लोहगड दुर्घटनेप्रकरणी नव्या चर्चांना उधाण; ढकलून दिल्याच्या शक्यतेबाबत चर्चा*
लोणावळा: लोहगड किल्ल्यावरून पडून मृत्यू झालेल्या केतन विशाल अग्रवाल यांच्या प्रकरणात विविध चर्चांना उधाण आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, केतन अग्रवाल हे त्यांच्या होणाऱ्या पत्नी सिया गोयल हिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोहगड किल्ल्यावर गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत काही मित्र-मैत्रिणीही उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार केतन यांना किल्ल्यावरून ढकलून देण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पोलीस या घटनेचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
तपास पूर्ण झाल्यानंतरच घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.