मध्यस्थी केल्याच्या रागातून तरुणावर वार

पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – मुळशी तालुक्यातील भुगाव येथे एका भांडणात मध्यस्थी केल्याचा रागातून चार जणांनी मिळून एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला केला. ही घटना २१ जून २०२६ रोजी सायंकाळी स्वप्नसिद्धी आंगण सोसायटीच्या पार्किंगमध्ये घडली.
​अनुज मंगेश शिंदे (वय १९), मयुर दिघे (वय २१, दोघे रा. भुगाव), आदित्य माझिरे (वय २३, रा. भुकुम) व एक अल्‍पवयीन मुलगा अशी आरोपींची नावे आहेत. शुभम शेखर हुले (वय २५, रा. भुगाव) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ ढमालेसोबत झालेल्या भांडणात फिर्यादीने मध्यस्थी केली होती. याचा राग धरून आरोपींनी “तुला मध्यस्थीची खूप हौस आहे” असे म्हणत फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी व धारदार शस्त्राने खांद्यावर आणि पायावर वार करून गंभीर जखमी केले. बावधन पोलीस पुढील तपास करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *