रिक्षाचालकाला बिअरच्या बाटलीने मारहाण

पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या रिक्षाचालकावर दोन जणांनी बिअरच्या बाटलीने हल्ला केला. ही घटना २१ जून २०२६ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास पिंपरीतील भाटनगरमध्ये घडली.
विश्वास अशोक शिंदे (वय २४) व आकाश भुंगा कांबळे (वय २२, दोघे रा. निराधार नगर, पिंपरी) अशी आरोपींची नावे आहेत. कुणाल पप्पु इजरत (वय २७, रा. भाटनगर) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या गल्लीतील नागेश सूर्यवंशी याचे आरोपींसोबत भांडण सुरू होते. फिर्यादी मध्यस्थी करण्यासाठी गेले असता आरोपींना त्याचा राग आला. आरोपींनी फिर्यादीला मारहाण करत बिअरच्या बाटलीने उजव्या खांद्यावर मारून जखमी केले. पिंपरी पोलीस पुढील तपास करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *