वेश्याव्यवसाय करणाऱ्या दोन महिलांवर कारवाई

पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – तळेगाव दाभाडे येथील जुन्या मुंबई-पुणे हायवेवर सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करणाऱ्या दोन महिलांवर पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला. ही कारवाई २२ जून रोजी दुपारी एकच्या सुमारास सीआरपीएफ गेट नंबर ३ जवळ करण्यात आली.
याप्रकरणी दोन महिलांवर गुन्‍हा दाखल केला आहे. पोलीस शिपाई अर्चना मधुकर पिसाळ (वय २६) यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना अडथळा निर्माण करत होत्या. त्यांच्या कृत्यामुळे सार्वजनिक शिष्टाचाराचा भंग होत असल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तळेगाव दाभाडे पोलीस पुढील तपास करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *