तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक

पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – तडीपारी आदेशाचा भंग करीत शहरात आलेल्‍या गुंडाला पोलिसांनी कोयत्‍यासह अटक केली. ही कारवाई २२ जून रोजी सकाळी त्रिवेणी चौक, निगडी येथे करण्यात आली.
सचिन उर्फ सुनील संतोष गायकवाड (वय २२, रा. एसआरए बिल्डिंग, निगडी) असे आरोपीचे नाव आहे. पोलीस शिपाई प्रदीप चंद्रसिंग पावरा यांनी फिर्याद दिली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला जून २०२५ मध्ये दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. मात्र, त्याने आदेशाचे उल्लंघन करून शहरात प्रवेश केला आणि तो बेकायदेशीरपणे ५०० रुपये किमतीचा लोखंडी कोयता बाळगून फिरत असताना पोलिसांना मिळून आला. निगडी पोलीस पुढील तपास करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *