खोली रिकामी करण्याच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला

​पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – भोसरी येथील शिवशंभो कॉलनीमध्ये २२ जून रोजी रात्री नऊच्या सुमारास वीज कनेक्शन कापल्याच्या आणि खोली रिकामी करण्याच्या वादातून एका तरुणावर दगड व काठीने जीवघेणा हल्ला करण्यात आला.
अजय चव्हाण (वय २४) व विजय चव्हाण (वय २२, दोन्ही रा. भोसरी) अशी गुन्‍हा दाखल केलेल्‍या आरोपीचंी नावे आहेत. विशाल परमेश्वर सुर्वे (वय २२, रा. गंधर्वनगरी, मोशी) यांनी फिर्याद दिली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रूम खाली करत नसल्याने फिर्यादीने लाईट कट केली होती. ती आरोपींनी पुन्हा जोडल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या फिर्यादी व त्यांच्या भावाला आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *