मुंबई : खासदार संजय दिना पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांना खुले आव्हान दिले आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुषमा अंधारे म्हणाल्या, “तुम्ही ठिकाण आणि वेळ सांगा, सुषमा अंधारे निशस्त्र यायला तयार आहे.” त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, संजय दिना पाटील यांच्या इशाऱ्यानंतर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत यांनीही आपली भूमिका मांडली होती. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी थेट आव्हानात्मक भूमिका घेतल्याने हा वाद अधिकच चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अलीकडच्या काळात राज्यातील विविध राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप आणि शाब्दिक संघर्ष वाढले असून या नव्या घडामोडीमुळे राजकीय वातावरण आणखी तापले आहे. सुषमा अंधारे यांच्या वक्तव्यावर आता संजय दिना पाटील किंवा इतर नेते काय प्रतिक्रिया देतात, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
