Pimpri-Chinchwad – संमतीशिवाय बँक खात्यातून १० लाख ७४ हजार रुपये लंपास

पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – चाकण येथील ॲक्सिस बँकेच्या शाखेतून १६ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२५ दरम्यान एका ग्राहकाच्या संमतीशिवाय त्याच्या खात्यातून तब्बल १० लाख ७४ हजार १२९ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली.
याबाबत अज्ञात चोरट्याच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. विकासकुमार पटलेस लोणी (वय ३२, रा. मेदनकरवाडी, चाकण) यांनी चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या संमतीशिवाय अज्ञात आरोपीने त्यांच्या बँक खात्‍यावरून बेकायदेशीरपणे ऑनलाइन पद्धतीने १० लाख ७४ हजार १२९ रुपये काढून फसवणूक केली आहे. पुढील तपास चाकण दक्षिण पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *