Pimpri-Chinchwad – मोशीतील तरुणाची ३० लाखांची फसवणूक

पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – मोशी प्राधिकरणातील केंद्रीय विहार येथे राहणाऱ्या एका तरुणाची इन्स्टाग्राम आयडीवरून ऑनलाइन गेमिंग आणि बेटिंगच्या माध्यमातून ३० लाख ८३ हजार ८२१ रुपयांची मोठी आर्थिक फसवणूक करण्यात आली.
इन्स्टाग्राम आयडी धारक ‘Four rabet’ विरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. प्रशांत सुरेश सपकाळ (वय ३३, रा. मोशी प्राधिकरण) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीच्या इन्स्टाग्रामवर गेमिंग व बेटिंगची जाहिरात पाठवली आणि पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवले. वेगवेगळ्या स्कॅनरवर वेळोवेळी पैसे भरायला लावून कोणताही परतावा न देता फसवणूक केली. पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *