पिंपरी, दि. 25 (प्रतिनिधी) – गोल्ड ट्रेडिंगच्या बहाण्याने एका व्यक्तीची 20 लाख 72 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. ही घटना किवळे येथे 2 ऑक्टोबर ते 6 डिसेंबर 2025 रोजी घडली.
अनन्या बंसल (रा. चंदिगड) हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. एका पुरुष फिर्यादी यांनी बुधवारी (दि. 24 जून) रोजी देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने एका ट्रेडिंग अॅपवर सोन्याच्या व्यापारात मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. फिर्यादीकडून वेगवेगळ्या बँक खात्यांवर 20 लाख 72 हजार रुपये भरून घेतले व फसवणूक केली. देहूरोड पोलीस पुढील तपास करत आहेत.
गोल्ड ट्रेडिंगच्या बहाण्याने 20 लाखांची फसवणूक
