Pimpri chinchwad-विशाल अग्रवाल यांच्या कुटुंबीयांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

​पिंपरी-चिंचवड(pimpri-chinchwad)-विशाल अग्रवाल यांच्या कुटुंबीयांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट.खटला ‘फास्ट ट्रॅक’वर चालवण्याचे आदेश; उज्‍वल निकम सरकारी वकील म्‍हणून काम पाहणार.केतन अग्रवाल यांचा खून त्‍याची भावी पत्‍नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी याने केला. या पाश्‍र्वभूमीवर मयत केतन याचे वडिल विशाल अग्रवाल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी पिंपरी-चिंचवड येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी अग्रवाल कुटुंबीयांना दिलासा देत, संबंधित प्रकरणाची सुनावणी ‘फास्ट ट्रॅक’ कोर्टात चालवण्याचे निर्देश दिले आहेत.
काही कार्यक्रमानिमित्‍त मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्‍यामध्‍ये आले होते. त्‍यावेळी त्‍यांनी अग्रवाल यांच्‍या कुटुंबियांची भेट घेत त्‍यांचे सांत्‍वन केले.
​या महत्त्वपूर्ण खटल्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील नियुक्ती करण्याची शिफारस (रिकमेंडेशन) मुख्यमंत्र्यांनी केली असून, पीडितांना आणि संबंधितांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, असे आदेशही त्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे आता या प्रकरणाला गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *