Denmark-डेन्मार्कमध्ये लाऊडस्पीकरवरून अझानला निर्बंध; सार्वजनिक शांततेच्या कारणास्तव निर्णय

डेन्मार्क(denmark)- सरकारने सार्वजनिक शांतता आणि ध्वनीप्रदूषणाच्या कारणास्तव कोपनहेगनच्या उपनगरांतील काही भागांमध्ये लाऊडस्पीकरवरून अझान देण्यावर बंदी लागू केली आहे. स्थानिक नागरिकांकडून वाढत्या तक्रारी आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

या निर्णयामुळे स्थानिक मुस्लिम समुदायाने नाराजी व्यक्त केली असून धार्मिक स्वातंत्र्यावर परिणाम होत असल्याची भूमिका काही संघटनांनी मांडली आहे. सध्या हा निर्णय एका प्रांतात लागू करण्यात आला असून, भविष्यात तो इतर भागांतही लागू करण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

यापूर्वीही डेन्मार्कमध्ये सार्वजनिक ठिकाणी बुरखा आणि नकाब परिधान करण्यावर निर्बंध लागू करण्यात आले होते. निर्वासित आणि स्थलांतरविषयक मंत्री मॉर्टन बोद्सकोव्ह यांनी देशातील सामाजिक एकात्मता आणि सार्वजनिक व्यवस्थेच्या दृष्टीने कठोर धोरणांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.

या पार्श्वभूमीवर डेन्मार्कमधील स्थलांतर, धार्मिक स्वातंत्र्य आणि सार्वजनिक धोरणांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *