पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – नोकरी देण्याच्या नावाखाली एका तरुणाची सहा लाख ८७ हजार ९८४ रुपयांची फसवणूक केली. ही घटना दि. ७ एप्रिल २०२५ ते ३ जानेवारी २०२६ दरम्यान माण, हिंजवडी येथे घडली.
’आपका वर्क’ व ‘डोलेज इंडिया’ कन्सल्टिंगचे अज्ञात इ-मेल आणि मोबाइल धारकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. लक्ष्मीकांत सुधाकर अनजनकर (वय ३६, रा. आयट्रेड होम्स, हिंजवडी, मूळगाव नागपूर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीला ई-मेलद्वारे संपर्क साधून चांगला जॉब मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी रजिस्ट्रेशन व इतर वेगवेगळ्या कारणांसाठी वेळोवेळी बँक खात्यावर पैसे घेतले. मात्र, पैसे घेऊनही जॉब न देता फसवणूक केली. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहे.
नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची पाऊण सात लाखांची फसवणूक
