पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – खंडणी न दिल्याच्या कारणावरून कोयत्याचा धाक दाखवून तोडफोड केली. ही घटना दि. २५ जून २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास रामनगर, चिंचवड येथील बालाजी मोबाइल व बालाजी स्टोअर्स या दुकानात घडली.
कल्ल्या उर्फ सुरज राजु जाधव (वय २७) आणि डीजे उर्फ रोहित हणुमंत मांजरेकर (वय २०, दोघे रा. रामनगर, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अजय भगवान पवार (वय ३२, रा. शाहूनगर, चिंचवड, पुणे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीच्या दुकानात येऊन कोयत्याचा धाक दाखवत दीड हजार रुपयांची मागणी केली. फिर्यादीने नकार दिला असता, आरोपींनी दुकानाच्या काऊंटरची काच फोडली आणि सामानाच्या बरण्या रस्त्यावर फेकून नुकसान केले. तसेच हवेत कोयता फिरवून ‘आम्ही इथले भाई आहोत’ अशी धमकी देत दहशत निर्माण केली. पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहे.
रामनगरमध्ये खंडणीसाठी दुकानाची तोडफोड; दोघांना अटक
