पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – एका व्यक्तीचा मोबाइल हॅक करून एक १८ हजार ८२३ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. ही घटना दि. ४ जून २०२६ रोजी दुपारी दत्तवाडी, आकुर्डी येथे घडली.
अज्ञात मोबाइल क्रमांक धारक आणि राजेश नावाच्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रवि केशव ठाकूर (वय ३६, रा. दत्तवाडी, आकुर्डी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीच्या व्हाट्सअॅपवर ट्रॅफिक नोटीसचे बिल भरण्या संदर्भात मेसेज पाठवून एक ‘APK’ फाइल पाठवली. फिर्यादीने ती फाइल डाउनलोड करताच त्यांचा मोबाइल हॅक झाला. त्यानंतर आरोपीने फिर्यादीचे क्रेडिट कार्ड वापरून ऑनलाइन दोन मोबाईल फोन खरेदी करून फसवणूक केली. या गुन्ह्याचा पुढील तपास निगडी पोलीस ठाणे करीत आहे.
मोबाईल हॅक करून सव्वा लाखांची ऑनलाईन फसवणूक
