Pune-मुख्यमंत्री फडणवीसांची ‘सारथी’ मुख्यालयाला भेट; विविध प्रस्तावांना मंजुरीचे आश्वासन

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी)च्या मुख्यालयाला भेट देत संस्थेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. यावेळी शासनाकडे सादर करण्यात आलेल्या विविध प्रस्तावांना मंजुरी दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, महापौर मंजुषा नागपुरे, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सचिव शैला ए., विभागीय आयुक्त शीतल तेली उगले, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील तसेच सारथीचे अध्यक्ष अजित निंबाळकर उपस्थित होते.

यावेळी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक महेश पाटील यांनी ‘सारथी’च्या विविध शैक्षणिक, संशोधन आणि कौशल्यविकास उपक्रमांची सविस्तर माहिती सादर केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *