ग्राहकाला हातातील कड्याने मारहाण

पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – एका बारमध्ये दारू पिताना बाटलीचे झाकण खाली पडल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात हॉटेल कामगाराने ग्राहकाच्या डोक्यात कड्याने मारून जखमी केले. ही घटना २६ जून रोजी चिखली पूर्णानगर येथे घडली.
कपिल शेरबहादुर बटला (वय १९, रा. पूर्णानगर, चींचवड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अरविंद प्रकाश सतार (वय ३७, रा. घरकुल, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बारमध्ये दारू पीत असताना झाकण पडल्यावरून आरोपीने ‘नीट दारू पी’ असे म्हणून हुज्जत घातली व अचानक डोक्यात कड्याने प्रहार केला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *