पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – पुरेशी सुरक्षा साधने न पुरविल्यामुळे चौथ्या मजल्यावरून तोल जाऊन पडल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना मारूंजी येथील सेव्हन स्टार सिटी बांधकाम साईटवर १२ मार्च रोजी घडली.
इमारतीचे मालक व्यंकट रामानौ सांगना (वय ४८, रा. पुणे) आणि ठेकेदार संजय रामसुख राजभर (वय २५, रा. मारूंजी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. ताराबाई बाळासो महांगरे (वय ६०, रा. हिंजवडी) यांनी २६ जून रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिन्यातून बांधकाम साहित्य नेताना सुरक्षा जाळी किंवा कठडा नसल्याने मजूर अशोक महांगरे यांचा तोल जाऊन खाली पडल्याने मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
चौथ्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू
