लग्नाचे आमिष दाखवून महिलेची ५ लाख रुपयांची फसवणूक

​पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – एका विवाहित महिलेला इन्स्टाग्रामवर लग्नाचे आमिष दाखवून युकेवरून महागडे गिफ्ट पाठविल्याचे भासवत कस्टम ड्युटीच्या नावाखाली ५ लाख ३ हजार रुपयांना गंडा घातला. ही घटना नवी सांगवी येथे १५ ते २६ जून दरम्‍यान घडली.
व्हॉट्सॲप क्रमांकधारक रेहान, डीएचएल कुरिअरचा कर्मचारी आकाश वर्मा आणि बँक खातेधारकांवर यांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. सना तोशीब शेख (वय ३०, रा. नवी सांगवी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला महागडे दागिने, आयफोन पाठवल्याचे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर कुरिअर कंपनीचा प्रतिनिधी बनून कस्टम ड्युटी भरण्यास भाग पाडले. सांगवी पोलीस या सायबर गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *