जादा नफा देण्याचे आमिष दाखवून ८८ लाखांची फसवणूक

​पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये भरघोस नफा कमवून देण्याचे आमिष दाखवून ८८ लाख १९ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. ही घटना बावधन येथे २ जून रोजी घडली.
दिव्या अग्रवाल-शर्मा (रा. लोधी कॉलनी, नवी दिल्ली) आणि तिच्या टेलिग्राम व विविध बँक खातेधारक साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अभिजीत प्रकाश कुलकर्णी (वय ४८, रा. बावधन) यांनी २६ जून रोजी फिर्याद दिली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बनावट वेबसाईटची लिंक पाठवून फिर्यादीला गुंतवणूक करण्यास सांगितले आणि नंतर वेगवेगळे टॅक्स भरण्याच्या नावाखाली एकूण ८८ लाख १९ हजार रुपये उकळले. सायबर पोलीस तपास करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *