पिंपरी, दि. २९ (प्रतिनिधी) – राहते घर आमच्या नावावर करून देण्याच्या कारणावरून मावशीने आपल्याच भाच्याचा डोक्यात पाटा घालून तसेच कोयत्याने गळा चिरून खून केला. ही घटना दि. २८ जून रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास पिंपळे गुरव येथील लक्ष्मी नगर परिसरात घडली.
कन्नन बालकृष्ण पडाची असे खून झालेल्या भाच्याचे नाव आहे. सेल्वराज राजंगम (वय ५२, रा. लक्ष्मी नगर, पिंपळे गुरव) असे अटक केलेल्या आरोपी मावशीचे नाव आहे. श्रेणी पोलीस उपनिरीक्षक विजय सर्जेराव शेलार यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी नगरमधील एका जागेवर आरोपी महिला सेल्वराज हिने जागा विकत घेतली होती. या जागेवर घर बांधण्यासाठी तिने आपली बहिण मयताची आई हिच्याकडून पैसे घेतले होते. त्यामुळे ते घर आपल्या नावावर करून देण्यासाठी आरोप कन्नन हा आपली मावशी आरोपी सेल्वराज हिला सतत त्रास देत होता. रविवारी मध्यरात्रीही मयत आरोपीच्या दरवाजावर लाथा मारून गेला होता. त्यामुळे संतापलेली मावशी आरोपीच्या घरात गेली. तिने लाथ घालून दारू प्यायलेल्या आरोपीला खाली पाडले. त्यानंतर त्याच्या डोक्यात पाटा (दगड) घातला. त्यानंतरही त्याची हालचाल सुरू असल्याने कोयत्याने गळा कापत त्याचा खून केला. याबाबत अधिक तपास सांगवी पोलीस ठाण्यातील निरीक्षक दिव्यांश नादेकर करीत आहेत.
हातगाडीचीही केली तोडफोड
आपले उदरनिर्वाह करण्यासाठी आरोपी सेल्वराज हिने इडली सांबर याचा गाडा टाकला होता. मात्र मालमत्तेच्या वादातून मयत कन्नन याच्या भावाने तो गाडाही तोडून टाकला. यामुळे सेल्वराज हिने परिसरातील काही घरांमध्ये धुणे-भांडी करण्यास सुरूवात केली.
—-
आई घरात असती तर…
ज्या दिवशी खूनाची घटना घडली त्या दिवशी मयत कन्नन याचे आपल्या आईसोबत भांडण झाल्याने ती नातेवाईकांकडे दापोडी येथे गेली होती. जर आई घरात असती तर खूनाचा हा प्रकार कदाचित घडलाही नसता.
पिंपळे गुरव येथे प्रॉपर्टीच्या वादातून भाच्याचा खून
