नवी दिल्ली : अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (APSEZ) आणि जगातील अग्रगण्य शिपिंग कंपनी मेडिटेरेनियन शिपिंग कंपनी (MSC) समूहाची टर्मिनल शाखा टर्मिनल इन्व्हेस्टमेंट लिमिटेड (TIL) यांच्यात महत्त्वपूर्ण करार झाला आहे.
या करारानुसार TIL ही अदानी विझिंजम पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (AVPPL) मधील ४९ टक्के हिस्सा विकत घेणार आहे. या व्यवहाराचे एकूण मूल्य २.८५ अब्ज अमेरिकी डॉलर (सुमारे ₹२३,००० कोटींपेक्षा अधिक) असल्याचे सांगितले जात आहे.
या धोरणात्मक भागीदारीमुळे केरळमधील विझिंजम आंतरराष्ट्रीय खोल समुद्री बंदराच्या विकासाला मोठी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच जागतिक कंटेनर वाहतूक आणि भारतातील बंदर क्षेत्रात अदानी समूहाची उपस्थिती आणखी मजबूत होणार असल्याचे मानले जात आहे.
