इयत्ता सहावी च्या बालभारती पाठ्यपुस्तकात सुशील दुधाणे यांच्या घाटवाटा पुस्तकातील ” निसर्गरम्य माथेरान” ट्रेकचा समावेश

२००६ सालापासून सह्याद्री रांगेतील घाटवाटांची, गड-दुर्गाची, प्राचीन वाडे, मंदिरे, बारव यांची भटकंती करायला सुरुवात केली. सुरुवातीला महिन्यातून एकदा, नंतर दोनदा व काही काळानंतर दर रविवारी भटकंती करित राहिलो. अनुभवाच्या शिदोरीवर यातून लेखन करित गेलो व पाहता पाहता ‘घाट वाटा’, ‘सह्याद्रीतील घाट वाटा’, ‘सह्याद्रीतील गड दुर्गाची भटकंती’,’भटकंती प्राचीन लेणी व मंदिराची’ या चार पुस्तकांची निर्मिती झाली. मी लिहिलेली पुस्तके सह्याद्रीत मनसोक्त भटकंती करणाऱ्यांना आवडू लागली. सह्याद्री रांगेत भटकंती करणाऱ्यांना माझी ओळख पटली. आणी आज त्या सर्व लेखणाचे, मनसोक्त भटकंती चे चीज झाले.
या वर्षा पासून बालभारती मार्फत नव्याने सहावी ची पुस्तके प्रकाशित झाली. इंग्रजी माध्यमाच्या मुलांसाठी तयार होत असलेल्या मराठीच्या इयत्ता सहावीच्या “शिकू मराठी आनंदाने” या पुस्तकात माझा एक पाठ समाविष्ट करण्यात आला आहे. माझ्या घाट वाटा या पुस्तकातील ‘माथेरान ट्रेक’ हा लेख यात घेतला आहे. मुलांच्या वयोगटानुसार व माध्यमांचा विचार करता आवश्यक तेथे यात संपादन केले आहे.हा आनंद माझ्या कायम स्मरणात राहणारा आहे.
बाल भारती लायब्ररी मधे माझे ‘घाट वाटा’ पुस्तक होते, त्यातील ‘ माथेरान ट्रेक ‘ हा पाठ समिती सदस्यांनी निवडला. याबद्दल मी समिती सदस्यांचे तसेच सविता वायळ, विशेषाधिकारी मराठी, बालभारती यांचे विशेष आभार मानतो.
सुशील शांता सुधीर दुधाणे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *