Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

व्यावसायिक वाहनांच्या फिटनेस चाचणीत मोठा बदल; पिंपरी-चिंचवडमध्ये उद्यापासून ‘ऑटोमेटेड टेस्टिंग’ सुरू

By Sumedh Chapalgaonkar
June 30, 2026 2 Min Read
0

आरटीओची नवी व्यवस्था १ जुलैपासून लागू; दिवसाला ३०० वाहनांची होणार संगणकीकृत तपासणी

पिंपरी-चिंचवड :
व्यावसायिक वाहनांच्या फिटनेस तपासणीत पारदर्शकता, अचूकता आणि वेग आणण्यासाठी पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार १ जुलै २०२६ पासून परिवहन संवर्गातील वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी स्वयंचलित वाहन चाचणी केंद्र कार्यान्वित करण्यात येणार आहे. यामुळे व्यावसायिक वाहनांच्या फिटनेस तपासणीची संपूर्ण प्रक्रिया आता संगणकीकृत पद्धतीने होणार आहे.

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आश्विनी स्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार ही व्यवस्था सुरू करण्यात येत आहे. मोटार वाहन कायद्यानुसार सर्व व्यावसायिक वाहनांना वैध फिटनेस प्रमाणपत्र असणे बंधनकारक असून, त्यासाठी आता स्वयंचलित चाचणी केंद्राची सुविधा उपलब्ध होणार आहे.

हे अत्याधुनिक चाचणी केंद्र सुमारे ११ हजार चौरस फूट जागेत उभारण्यात आले आहे. येथे दोन हजार चौरस फुटांचे प्रशस्त कार्यालय असून वाहन तपासणीसाठी ३३ मीटर लांबीचे चार स्वतंत्र ट्रॅक तयार करण्यात आले आहेत. यापैकी दोन ट्रॅक मालवाहतूक आणि प्रवासी वाहनांसाठी राखीव असतील. केंद्रात चार इन्स्पेक्शन पीटची सुविधा असून दररोज सुमारे ३०० वाहनांची तपासणी करण्याची क्षमता विकसित करण्यात आली आहे.

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी वाहनधारकांना ऑनलाइन पद्धतीने अपॉइंटमेंट घेणे बंधनकारक राहणार आहे. वाहनधारकांनी वाहन पोर्टलवरील अधिकृत संकेतस्थळावर जाऊन राज्य, जिल्हा आणि वाहनाचा प्रकार निवडून स्वयंचलित चाचणी केंद्रासाठी वेळ निश्चित करावी. नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर प्राप्त होणारा ओटीपी टाकून प्रक्रिया पूर्ण करावी आणि विहित शुल्क ऑनलाइन भरावे. मोबाईल क्रमांक अद्ययावत नसल्यास तो प्रथम आरटीओच्या नोंदीत अद्ययावत करणे आवश्यक आहे.

आरटीओ प्रशासनाने वाहनधारकांना चाचणीसाठी येताना वाहन पूर्णपणे सुस्थितीत आणण्याचे आवाहन केले आहे. तसेच वाहनाची सर्व वैध कागदपत्रे, व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस, स्पीड लिमिटर आणि रेट्रो रिफ्लेक्टिव्ह टेपसंदर्भातील आवश्यक प्रमाणपत्रे सोबत आणणे बंधनकारक राहणार आहे.

स्वयंचलित वाहन चाचणी प्रणालीमुळे तपासणी प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप कमी होणार असून, फिटनेस चाचणी अधिक पारदर्शक, विश्वासार्ह आणि वेळेची बचत करणारी ठरणार आहे. वाहनधारकांनी कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी वेळेत ऑनलाइन नोंदणी करून निश्चित वेळेनुसारच वाहन चाचणीसाठी आणावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे.

Author

Sumedh Chapalgaonkar

Follow Me
Other Articles
Previous

जुलैमध्ये पाच तालुक्यांत आरटीओची पक्क्या लायसन्ससाठी विशेष शिबिरे सायंकाळी पाच वाजता ऑनलाईन कोटा खुला; खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळ्यात होणार चाचण्या

Next

इयत्ता सहावी च्या बालभारती पाठ्यपुस्तकात सुशील दुधाणे यांच्या घाटवाटा पुस्तकातील ” निसर्गरम्य माथेरान” ट्रेकचा समावेश

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न
  • Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

CATEGORIES

  • Uncategorized (478)
  • क्राईम (264)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (908)
  • पुणे (141)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (95)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
July 31, 2026

शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा

Sumedh Chapalgaonkar

पुणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी उपलब्ध...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. ३१ (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नप्रकरणी पिंपरी-चिंचवड येथील विशेष पोक्सो न्यायालयाने...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (१ ऑगस्ट) रोजी निगडीतील भक्ती-शक्ती...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

Sumedh Chapalgaonkar

– महावितरणच्या ‘प्रकाश भवन’ कार्यालयामध्ये शहरातील वीज प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक – पिंपरी-चिंचवडसह राजगुरुनगर, लोणावळ्यासाठी नवीन...

Read More
July 31, 2026
July 30, 2026

सराईत वाहन चोरट्यांना अटक; पाच वाहने जप्त

Sumedh Chapalgaonkar

चिखली पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरांना अटक केली. त्यांच्याकडून चार दुचाकी आणि एक रिक्षा अशी...

Read More
July 30, 2026
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Jul    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme