पिंपरी, दि. ३ (प्रतिनिधी) – ट्रॅव्हल्स बसमधून ४५ हजार रुपये किमतीची बॅटरी आणि स्टेपनी चोरणाऱ्या दोन चोरांना पोलिसांनी अटक केली आहे. ही चोरी १ जुलै रोजी सायंकाळी ४:०० ते साडेपाचच्या दरम्यान भोसरी येथील बाबर पेट्रोल पंपाच्या पाठीमागे घडली.
ट्रॅव्हल्स चालक दादासाहेब गिनॅनदेव ढाकणे (वय ४८, रा. धावडे वस्ती, भोसरी) यांनी तक्रार दिली आहे. लखन गौतम चौधरी (वय ३० वर्षे, रा. पारोळा, जळगाव) आणि विजय प्रकाश कोळी (वय ४३ वर्षे, रा. आसोदा, जळगाव) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची ट्रॅव्हल्स पार्क केली असता आरोपी यांनी संगनमताने लबाडीच्या इराद्याने बसमधील मुद्देमाल चोरला. याप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. भोसरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
