पिंपरी, दि. ३ (प्रतिनिधी) – एका घरातून हँडबॅगमधील पर्स चोरून त्यातील आठ लाख १० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी एका तरुणीवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १ जुलै रोजी सकाळी ९:३० ते १०:३० च्या दरम्यान घडली.
लता अंकुश चौधरी (वय ६५ वर्षे, रा. गोलेगाव, खेड) यांनी तक्रार दिली आहे. शिवानी निलेश जाधव (वय २३ वर्षे, रा. वहिले आळी, आळंदी) असे आरोपी तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या बहिणीच्या घरातून आरोपी हिने फिर्यादीच्या परवानगीशिवाय हँडबॅग मधून पर्स काढून त्यातील ८,१०,०००/- रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. आळंदी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
दागिने चोरी प्रकरणी तरुणीवर गुन्हा दाखल
