मोबाइल घेतल्‍याच्‍या संशयावरून एकाचा खून; आरोपी अटकेत

पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – मोबाइल घेतल्याच्या संशयावरून एका मजुराने ४२ वर्षीय व्यक्तीला जबर मारहाण करून खून केला. ही घटना मोई गावच्या हद्दीतील गुरुकृपा हाउसिंग सोसायटीत २९ जून रोजी रात्री साडेदहा वाजताच्‍या सुमारास घडली आहे.
चाँद याकुब शेख (वय ४२) असे खून झालेल्‍या व्‍यक्‍तीचे नाव आहे. ​हरालाल सुभाष चंद्र गौतम (वय २८, रा. निघोजे, खेड, मूळ रा. उत्तर प्रदेश) याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत मयत व्‍यक्‍तीच्‍या पत्‍नीने शुक्रवारी (दि. ३ जुलै) रोजी फिर्यादी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हरालाल याला फिर्यादीच्या पतीवर त्याचा मोबाइल घेतल्याचा संशय होता. याच कारणावरून झालेल्या वादातून आरोपीने फिर्यादीचे पती चॉंद शेख यांना चेहऱ्यावर गंभीर मारहाण करून जखमी केले व जीवे ठार मारून तो पळून गेला होता. पुढील तपास दक्षिण महाळुंगे पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *