पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – किरकोळ भांडणाचा राग मनात धरून एका कामगाराचा डोक्यात हातोडी मारून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना खेड तालुक्यातील चऱ्होली खुर्द येथील घोलप वस्तीत २ जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली आहे.
करवीरसींग नथुसिंग लोधी (रा. मध्य प्रदेश) असे खून झालेल्या आरोपीचे नाव आहे. साहिल रामदास दाभाडे (वय २९, रा. घोलप वस्ती, काकडे सिटी, चऱ्होली खुर्द, खेड) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत कंत्राटदार चंद्रकांत पंढरीनाथ भाळे (वय ४३, रा. देहू फाटा, हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी साहिल दाभाडे याने जुन्या किरकोळ भांडणाचा राग मनात धरून करवीरसींग लोधी यांच्या डोक्यात हातोडीने मारून त्यांना जिवंत मारले. पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहे.
—
च-होलीत किरकोळ वादातून हातोडीने वार करून खून
