पत्नीसोबतचे संबंध तोडण्यास सांगितल्याने तरुणावार खुनी हल्‍ला

​पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – पत्नीसोबतचे प्रेमसंबंध तोडण्यास सांगितल्याच्या रागातून एका कारपेंटरवर चाकूने खुनी हल्ला केला आहे. ही घटना ताथवडे येथील अशोक नगर भागात २ जुलै रोजी रात्री साडेदहा वाजताच्‍या सुमारास घडली आहे.
सूरज बैच्या सरदार (वय २७, रा. अशोकनगर, ताथवडे) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी ३१ वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या पत्नीचे आरोपी सूरजसोबत प्रेमसंबंध होते. फिर्यादीने आरोपीला गाठून ‘माझ्या पत्नीसोबतचे संबंध सोड’ असे बजावले. याचा राग आल्याने आरोपीने ‘तुला जिवंत सोडत नाही’ असे म्हणून खिशातील चाकूने फिर्यादीच्या डाव्या हातावर व बरगडीत वार खुनी हल्‍ला केला. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *