किराणा मालाचे पैसे न दिल्याने मित्रावर चाकूने हल्ला

पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – किराणा दुकानदाराचे पैसे का दिले नाहीत, अशी विचारणा केल्याच्या रागातून एका तरुणाने आपल्याच मित्रावर चाकूने वार केले. ही घटना चाकण येथील ग्रीन इस्टेट बकरी बाजार परिसरात ३० जून रोजी रात्री दहा वाजताच्‍या सुमारास घडली आहे.
नरेशकुमार रामप्रगाश महतो (वय १८, रा. बकरी बाजार, चाकण, मूळ रा. बिहार) याला अटक केली आहे. शवकुमार दिनेश महतो (वय १९, रा. चाकण, मूळ रा. बिहार) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने किराणा दुकानातून माल घेऊन फोन पे वरून पैसे पाठवले नव्हते. फिर्यादीने त्याबाबत विचारणा केली असता, आरोपीने रागाने भाजी कापण्याच्या चाकूने फिर्यादीच्या डाव्या हाताच्या पोटरीवर व पोटावर वार करून गंभीर जखमी केले. पुढील तपास उत्तर चाकण पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *