भरधाव दुचाकी घसरून १७ वर्षीय मुलीचा मृत्यू

​पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – भरधाव वेगातील दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एका १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना बोऱ्हाडेवाडी, मोशी येथील संभाजी महाराज पुतळ्यासमोर २७ जून रोजी रात्री साडेतीन वाजताच्‍या सुमारास घडली.
सरंजली प्रकाश कराळे (वय १७) असे मयत मुलीचे नाव आहे. यश बाळासाहेब निकम (वय २१, रा. मेदनकरवाडी, चाकण) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मृत मुलीची आई रेणुका प्रकाश कराळे (वय ३६, रा. पाटण, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मुलगी सरंजली कराळे ही आरोपी व तिच्या मैत्रिणीसोबत दुचाकीवरून जात असताना गाडी घसरली. आरोपीने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून वाहन चालवल्याने सरंजलीच्या डोक्याला गंभीर मार लागून ती मरण पावली. पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *