पिंपरी, दि. 5 (प्रतिनिधी) – आजारी मामीने विश्वासाने दिलेला महागडा मोबाइल आणि सिमकार्ड परत न करता त्याचा अपहार केला. ही घटना मोशी येथील स्वामी समर्थ कॉलनीत १९ जानेवारी ते २३ जानेवारी दरम्यान घडली आहे.
सुनिता विजय साळुंखे (वय ५९ वर्षे) व कल्पना अनंत रडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत इंद्रायणी पार्क, बोराडेवाडी, मोशी येथील एका महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची तब्येत बरी नसल्याने त्यांनी त्यांच्या घरी आलेल्या आरोपी भाचीला आपल्या पतीचा २० हजार रुपयांचा मोबाइल व सिमकार्ड कन्व्हर्ट करण्यासाठी दिले होते. मात्र, आरोपीने ते सिमकार्ड व मोबाइल परत न करता अपहार केला. पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत.
भाचीनेच केला मामाच्या मोबाइलचा अपहार
