हिंजवडीत कारची मोपेडला धडक

​पिंपरी, दि. 5 (प्रतिनिधी) – एका भरधाव स्विफ्ट कार चालकाने मोपेडला जोरदार धडक देऊन गंभीर अपघात केला ही घटना २ जुलै रोजी सकाळी हिंजवडी येथील आयबीआयएस हॉटेलच्या एक्झिट गेटसमोर घडली.
स्विफ्ट कार (क्रमांक एम पी १७ सीडी ३३३८) वरील चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार मधुकर मल्लीनाथ कोळी यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून सार्वजनिक रस्त्यावर भरधाव व बेदरकारपणे कार चालवली. त्याने रस्त्यावरून जाणाऱ्या एका मोपेडस्वाराला धडक दिली आणि अपघाताची कोणतीही माहिती न देता तो घटनास्थळावरून पळून गेला. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *