पिंपरी, दि. 5 (प्रतिनिधी) – नवलाख उंब्रे येथील शाफलर कंपनीत पुरेशी सुरक्षा न ठेवता काम सुरू ठेवल्याने झालेल्या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू, तर तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना ९ जून रोजी घडली होती.
सतीश सावळे (वय ४७, रा. तळेगाव दाभाडे), हेमंत बाळ (वय ४८, रा. वारजे, पुणे), ए. के. पलाणी (वय ५५, रा. चिंचवड), अस्ल प्रकाशम (वय ५५), आयवन टेलीस (वय ५०), अब्दुलरेहमान अंतुले (वय ५२) व इतरांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब रामचंद्र जगदाळे (वय ५७) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी तळघरात परमिशन व सुरक्षा साधनांशिवाय काम सुरू ठेवले. त्यामुळे कार्बन डायऑक्साइड सिलेंडर बदलताना झालेल्या अपघातात वैभव थोरात व गौरीशंकर शर्मा यांचा मृत्यू झाला, तर इतर तिघे जखमी झाले. पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करीत आहेत.
शाफलर कंपनीतील गॅस गळती प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल!
