संचित रजा संपवूनही कारागृहात न परतणा-या कैद्यावर गुन्‍हा

​पिंपरी, दि. 5 (प्रतिनिधी) – छत्रपती संभाजी नगर मध्यवर्ती कारागृहातून २१ दिवसांची संचित (पेरोल) रजा मंजूर होऊन बाहेर आलेला एक कैदी मुदतीत कारागृहात हजर न होता फरार झाला. ही घटना चाकण येथे उघडकीस आली आहे.
किरण विलास भोसले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. कारागृह शिपाई रामेश्वर गंगाराम पालवे (वय ५१) यांनी चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला १२ फेब्रुवारी २०२६ रोजी २१ दिवसांच्या रजेवर सोडण्यात आले होते. त्याने ४ मार्च २०२६ रोजी संध्याकाळी ५ वाजेपूर्वी कारागृहात हजर होणे बंधनकारक होते. मात्र, तो मुदत संपवूनही हजर न होता जाणीवपूर्वक फरार झाला आहे. पुढील तपास चाकण दक्षिण पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *