Delhi-हॉर्मुझ सामुद्रधुनीजवळ कतारच्या LNG जहाजावर संशयित ड्रोन हल्ला; गुजरातकडे येणाऱ्या जहाजावरील चारही भारतीय सुरक्षित

नवी दिल्ली : हॉर्मुझ सामुद्रधुनीजवळील ओमानच्या आखातातून गुजरातमधील दहेज बंदराच्या दिशेने प्रवास करणाऱ्या कतारच्या LNG वाहतूक जहाज ‘LNGC Al Rekayyat’ वर संशयित ड्रोन हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत जहाजाच्या इंजिन रूममध्ये आग लागून धुराचे लोट उठले. मात्र, जहाजावरील चारही भारतीयांसह एकूण २९ खलाशी सुरक्षित असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.

हे जहाज कतारमधील रास लाफान येथून गुजरातच्या दहेज बंदराकडे येत होते. प्राथमिक माहितीनुसार, हल्ल्यानंतर जहाजाचे काही नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी किंवा पर्यावरणीय हानी झालेली नाही. जहाज आपला प्रवास पुढे सुरू ठेवत असल्याचे सांगण्यात आले आहे.

हॉर्मुझ सामुद्रधुनी परिसरातील वाढत्या सुरक्षा धोक्यांच्या पार्श्वभूमीवर या घटनेकडे अत्यंत गंभीरतेने पाहिले जात असून, भारतीय खलाशांच्या सुरक्षेवर संबंधित यंत्रणांकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *