नवी दिल्ली : जगातील आघाडीची तंत्रज्ञान कंपनी मायक्रोसॉफ्टने यंदाच्या वर्षातील दुसऱ्या मोठ्या नोकरकपातीची घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे २.१ टक्के म्हणजेच ४,८०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मायक्रोसॉफ्टकडून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील अब्जावधी डॉलर्सच्या गुंतवणुकीला गती देण्यात येत असून, त्यासाठी कंपनीकडून संघटनात्मक पुनर्रचना केली जात आहे. या नोकरकपातीचा सर्वाधिक फटका Xbox गेमिंग आणि काही व्यावसायिक विभागांना बसणार असल्याची माहिती समोर आली आहे.
कंपनीच्या या निर्णयामुळे जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकरकपातीची मालिका आणखी तीव्र झाली असून, AI क्षेत्रातील वाढत्या गुंतवणुकीसाठी कंपन्या खर्चात कपात करत असल्याचे चित्र दिसत आहे.
